Monday, July 27, 2015

Humanity Ahead.......! "हणमंतराव गायकवाड"
भारतीय रेल्वेबद्दल मी या आधीही लिहीलय आणि लिहतच राहीन कारण रेल्वे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे... बाकी कुठल्याही पब्लिक ट्रांसपोर्टपेक्षा रेल्वेला माझी पहीली पसंती असते...

तर असो....

आज लिहायचं कारण ही तसच आहे...

मी मुंबई - गोवा ह्या लोहमार्गावर महिन्यातून 2-3 वेळा प्रवास होतच असतो... काही पर्सनल कामानिमत्त परवा असाच जनशताब्दीने प्रवास करताना एक बदल पहायला मिळाला जो स्वागतार्ह नक्कीच आहे.... चिपळुन गेलं आणि चार यूनिफार्मधारी सफाई कामगार रेल्वेत चढले...

माझ्यासारखच सगळेच अवाक नजरेने त्यांच्याकडे पाहतायेत... कारण ह्यापुर्वी गाडी एकदा दादरहुन सुटली की डायरेक्ट मडगांवला पोचल्यावरच साफसफाई होत असे... त्या डब्यात माझी सर्वात शेवटची जागा आणि जनशताब्दी ही फक्त सिटींग असलेली गाडी... त्यातला एक जण आला त्याने सगळ्यात पहीलं सगळा कचरा एका झाडुने गोळा केला... अगदी प्रत्येक प्रवाश्याच्या पायाजवळ जावुन त्याने झाडु फिरवली...मी अजुनही त्याच्याकडे आवासुन बघतोय... तो गेला लगेच दुसरा एका पाण्याच्या बाटलीतुन हीरवगार काहीतरी घेवुन आला... मी मनात म्हटलं अरे पन्हं दिसतय.... बघतो तर त्याने ते बाटलीतलं गाडीत सगळीकडे फुस फुस केलं... त्या फिनाइलचा वास काय मला घेता आला नाही कारण नाकात एक वेगळच फिनाइलसदृश लिक्विड आधिच ठाण मांडुन होतं... त्यादिवशी मला भयानक सर्दी खोकला होता... नायतर त्या वासाची विशिष्ट ओळख मी नक्कीच करुन दिली असती माझ्यात असलेल्या वासुगिरी ह्या गुणधर्मानुसार...पन्हवाला गेला आणि त्याच्या मागोमाग लगेचच तिसरा एका काठीला खाली स्पंज असलेल्या झाडुने त्याने ते सर्व पन्हं ब्रेडवर मस्का लावावा तसं सगळीकडे फिरवलं... एव्हाना गाडीतल्या बर्याच बायकांनी पाय वर सिटवर घेवुन घरी कसं कामवाली बाईला आर्डरी सोडतात तसं इथेही "हे इथे राहीलं"... "ते जरा परत इथे माराना"...असं करुन एक चान्स मारुन घेतला..!

तो गेला आणि चौथा आला तो बहुतेक आधीच्या तिघांना सिनीयर असावा.... त्याच्या हातात काही कागदं आणि पेन होतं...आला तो सरळ माझ्याकडेच...म्हटला "सर फीडबैक दो"...माझी collar लगेचच टाईट ना..."फीडबैक देना है क्या" मी म्हटलं तसं त्याने माझ्या हातात एक form दिला "Central Railway Mumbai Division" चे हे सफाई कामगार असुन "BVG India Ltd." ला ह्याच contract मिळालय हे मला त्या form वरुन कळलं...मी नाव लिहीलं, मोबाइल नंबर टाकला, सही केली त्याने ते घेतलं आणि तो त्याच डब्यातल्या इतर प्रवाश्यांकडे फीडबैक घेण्यासाठी निघुन गेला........

ते चौघही गेले पण "BVG" बद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता मला काही गाडीत स्वस्थ बसु देत नव्हती आणि नेटवर्कही नव्हतं....

आज सकाळी कामावर पोहचल्या पोहचल्या आधी गुगलबाबाकडे BVG चा सर्च मारला तर bvgindia.com ने "स्वामी विवेकानंदाच्या" फोटोसह स्वागत केलं चार ओळींतले त्यांचे विचारही तिकडे होतेच... आतातर त्या माणसाबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती ज्यांनी ही किमया केली होती... "श्रीमंत बनवणारी स्वच्छता" हा त्यांचा 20 मे 2015 ला लोकसत्ताला आलेला लेख वाचला त्यांच्याच वेबसाइटवर उपलब्ध आहे..."हणमंतराव गायकवाड" हे नाव ह्या पुर्ण सिस्टमच्या पाठीशी आहेत हे त्यांच्या "Humanity Ahead" ह्या त्यांच्या ब्रीदवाक्यातुनच कळतं...............!


bvgindia.com/?news=श्रीमंत-बनवणारी-स्वच्छता

#bvgindia #indianrailway #konkanrailway

Friday, July 17, 2015


ईफ्तार                                                                               06.07.2015


आत्ताच एका मित्राने what'sapp वर ईफ्तारच निमंत्रण दिलं म्हटला... आजा मीनारा मस्जिद जाऐंगे ईफ्तार के बाद नॉनवेज खाऐंगे... तर त्याबरोबर बातचीत चालू असताना मी मला आजपर्यंत पडलेले काही प्रश्न त्याला विचारले..
मी : सात बजे के बाद खाना खाते है उसे क्या कहते है?
तो : "ईफ्तार" और सुबह चार बजे के खाने को "सेहरी" कहते है
मी : Ya I heard about iftar party..
तो : सही सुना है..
मी : मीनारा मस्जिद किधर है?
तो : मीनारा मस्जिद, मस्जिद मुंबई में है, CST स्टेशन से नजदिक है..
मी : By the way मुझे मस्जिद आना allow है क्या?.. खासकर एक हिंदू ब्राम्हण को... Actually I am not believe on जात, धर्म एक curiosity है... बहुत सालोंसे मन में था इसलिए पूछा???
तो : Ya why not '..अगर आप सच्चे दिलसे आओगे तो सब allowed है!!!
मी : Okay.. Then I am ready to join you...
तो : आजा तारीख बना... निकलते है! मी : लेकिन एक आखिरी सवाल... मस्जिद आने के लिए मुझे क्या कुछ करना होगा???
तो : हा.. घरसे निकलते वक्त धुले कपड़े, अच्छेसे स्नान करके आना होगा... जिसे हम "पवित्र पाक साफ" कहते हैं.. और मस्जिद के अंदर जाते समय "वुझु" भी करना होता है जैसे हाथ, पैर, सर और चेहरे को भिगोना होता है...
मी : ठीक है DONE!.. Next Saturday/Sunday चलते है..
तो : Thursday नहीं तो Friday चलते है.. अच्छे दिन मानते है! (शुभदिवस).
मी : no problem! तो : हाजी अली, माहीम दर्गा और आखिर में मीनारा ठिक है..?
मी : हा ठीक है.. कोई वांदा नै!

-सुंदर...!