Thursday, June 11, 2015

2.6.2015

नवीमुंबई महानगरपालिकेचा वैद्यकीय कर्मदळिद्रिपणा!

नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुका आणि मतांच्या भिकेसाठी लोकांच्या घरी जाऊन चपला झिजवणारे लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेला खरी गरज असते तेव्हा कुठे गायब असतात हा प्रश्न आज प्रकर्षाने जाणवत होता जेव्हा एका गरजु गरोदर स्त्रीला शासनाच्या भोंगळ कारभाराचा सामना करावा लागला....
सोनोग्राफी करण्यासाठी म्हणून दिघ्यातील पालिकेच्या रुग्णालयात गेलेल्या चार महीन्याच्या गरोदर महीलेला कारण नसताना न.मुं.म.पालिकेच्या वैद्यकीय अनास्थेला बळी पडावे लागले, सोनोग्राफीसाठी एकट्याच गेलेल्या गरीब महीलेला सर्वप्रथम तिथूनच जवळ 20 मिनिटावर असलेल्या खाजगी दवाखान्यात पाठवण्यात आले कशीबशी उन्हातान्हात ती गेलीही तिकडे पोचल्यावर पहीला बराच वेळ कोणी दादच देईना मग तिथुन काहीही कारण न देता तिला रबाळेतील पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले तिकडेही ती पोहचली तर तेथील कर्मचार्यांनी मशीनरी उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला वाशीला जायला सांगीतले, शुक्रवारी वाशीत सोनोग्राफी होत नाही हे रबाळ्यातील कर्मचार्यांना माहीत असुनही त्यांनी तीला तिकडे जाण्यासाठी सांगितले, रणरणत्या उन्हात ती तशीच बसने वाशीत पोहचली तिकडे गेल्यावर तीला डॉक्टरच उपलब्ध नाहीत, आज सोनोग्राफी होणार नाही, तुम्हाला पाठवलच कसं हे प्रश्न करुन तीला घरी जाण्यास सांगण्यात आले एव्हाना दुपारचे दोन वाजुन गेले होते, एक एकटी गरीब गरोदर महिला 4 ते 5 तास कडक उन्हात कारण नसताना हा त्रास सहन करते आज जर ती कुठे चक्कर येऊन पडली असती काही अपघात झाला असता तर ह्याला जबाबदार कोण???...नव्या करकरीत इमारतेतील वातानुकुलित कक्षात बसून पालिकेचा कारभार सांभाळणार्यांना कधी कळणार जनतेचा त्रास???...पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ह्यांना जबाबदारीची जाणीव कधी होणार???... ही काय पहील्यांदा घडलेली घटना नाही ह्या आधीही आणि उद्याही ह्या अशा त्रासाला लोकं बळी पडतील, नुसतं सायबर सिटी म्हणून मिरवणार्या आणि महागड्या गाड्यातुन फिरणार्या लोकप्रतिनीधिंनी एक गोष्ट लक्षात असुद्या की तुम्ही जनतेचे नोकर आहात काहीच हक्क नाही तुम्हाला आमच्या कररुपी मिळणार्या पैशातुन चैन करण्याचा!!!
2.6.2015

काही प्रसंग लिहीताही येत नाहीत आणि कुठे उघडपणे मांडताही येत नाहीत, जेव्हा ते बाहेर पडतात तोपर्यंत ते

आटलेल्या विहीरीसारखे होतात परत उकरुन पाणीही लागत नाही आणि नुसती उघडीही ठेवता येत नाही

त्यापेक्षा वरुनच माती टाकुन बुजवलेलंच बरं......








...........माझी वासुगिरी...!




प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात "वासुगिरी" ही भानगड थोड्याफार प्रमाणात डोकवतेच... तसही ह्या असल्या भानगडी काय नविन नाय राहील्यात...पण इथे माझी वासुगिरी पुरुषाच्याच नव्हे तर सर्वच प्राण्यांत दिसते...एव्हाना लक्षात आलं असेलच..."आपली घ्राणेंद्रिये(Scent Receptors) 50 हजार प्रकारचे वास लक्षात ठेवु शकतात"...म्हणजेच एकदा का मी पेट्रोलचा वास घेतला की परत ते न बघताही मी सांगु शकतो की हे पेट्रोल आहे...पेट्रोलच नाही तर इतर कुठलाही वास...एखाद्या पदार्थाच्या वासावरुन जशी भूक चाळवते तशी ती सर्वच पदार्थाच्या वासावरुन चाळवेल असही नाही...जस मटणाचा वास...जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की कीचनमधे मटन शिजतय तोपर्यंत दहा फेर्या तरी होतातच आम्हा खवय्यांना तर सवयच असते परत परत टोप उघडुन बघायची पण जर समजा एखाद दिवशी अचानक मटनाचा वास आला आणि टोपात बघीतलं तर काळ्या वाट्याण्याची आमटी...च्यायला काय मूड जातो सांगू...शिजताना वास जरी थोडेफार सारखा येत असला तरी किती फरक पडतो जेवणात...



तसच प्राण्यांच्या बाबतीतही... वास ही क्रिया सर्वात जलद आणि तिक्ष्ण असते...डिस्कवरीवरच्या "Animal Science" प्रोग्राममधे दाखवल्याप्रमाणे वास घेण्याच्या बाबतीत अस्वलाच नाक कोणीच धरु शकणार नाही..."काळं जंगली अस्वल 28 ते 30 किलोमीटरवर मेलेल्या प्राण्याचा वास घेत सरळ एका रेषेत तिथे पोहचण्याची क्षमता ठेवतं"...आणि तेच "ध्रुवीय (बर्फात राहणार) अस्वल 3फुट जाडीच्या बर्फाच्या थरावरुन खाली असणार्या सील मास्याचा वास घेवु शकतं"...

ह्याच प्राण्यांच्या वासुगिरीत दूसरा नंबर "ग्रेट व्हाइट शार्क" (मुंबईतली पांढर्या पाकाची मोरी) माश्याचा लागतो...



"कुठेतरी वाचनात आलेल की हैदराबाद मधे पेट्रोल पंपावर काम करणारी एक महिला सुरुवातीला त्या वासाला कंटाळुन सारखी आजारी पडायची पण नंतर सवय झाल्यावर तीला त्या वासाचं ऐवढं व्यसन लागलं की रात्र रात्र तीला झोप लागायची नाय...मग करणार काय म्हणून ह्या बाई घरातले सर्व झोपले की गोमूत्र शिंपडावं तसं पेट्रोल शिंपडायच्या आणि मगच ह्या बयेला झोप लागायची..."

हे वासाच व्यसन म्हणा किंवा त्रास प्रत्येकाला असतोच... काहींना रंगाचा वास आवडतो तर काहींना सिगरेटचा...काहींना कांद्याचा वास जसं डोळ्यात पाणी आणतो तसं तोच कांदा काहींना शुध्दीवर आणतो......लहान असताना मला एका वासाची जाम भिती वाटायची..."दारुच्या!".... हा वास आणि ती लटपट लटपट करणारी माणसं समोर आली की बोलतीच बंद व्हायची... पण आता सवय झालीय..... हा! हा! हा! मी पीत नाय पण काही मित्रांना हा वास हवाहवासा वाटतो कारण हवेत राहण्याचा एकटच बडबड करत राहण्याचा फिल देतो हा वास त्यांच्या मते...;-)

मुंबईत लोकलने नियमित प्रवास करणारे वासु लोकं नुसत्या वासाने ओळखतात गाडी कुठल्या ठेसनात आली ते...हा अनुभवाचा भाग झाला...माझाही तसाच एक अनुभव आहेच...कोकणरेल्वेने मुंबईला जाताना नुसत्या वासावरुन समजायच की रत्नागिरी आलय कारण आजुबाजुला असणार्या मासेप्रक्रीया कारखान्यांतुन येणारा वास तो एक वास आहे तसाच हार्बर चा शिवडी स्थानकात गाडी आली की येणारा सुकटाचा वास...नकोश्या वाटणार्या वासाच्या बाबतीत पुरस्कार प्राप्त मुंबईतलं उपशहर म्हणजे "कुर्ला"...



श्रीलंकेचा right arm fast baller "चमिंडा वास" ह्याला कसं विसरेन...हा ball टाकायला आला की बाबा मुद्दामच म्हणायचे "vaas इलो" की तिकडून आई लगेच "कसलो वास इलो हो" आणि हे ऐकून मी आणि माझी लहान बहीण खिदीखिदी हसायचो...हा चमिंडा वास आता खेळत नाय...



"केस जळाले नाकातले"... तसचं "काही जळलं का" या म्हणी पण आपण वापरत असतोच की...

काही वासाड्यांना काही ठरावीक उंबरटे झिजवायची लयच हौस असते...सई आणि राधिका यांच्या हंटर सिनेमातल्या वासुगिरीविषयी बोलाल तर त्या विषयाचा गाढा अभ्यास नसल्याने उगाचच हात घालण्यात कसली मजा...

त्यामूळे बऱ्याच जणांची तर हेडिंग वाचुनच निराशा झाली असेल!!!



पहीला पाऊस पडताच जो मातीचा वास दरवळतो ना हवेत हा मला नवचैतन्य देतो...

पण मुंबईतल्या डांबरी रस्त्यावरचा पहील्या पावसाचा हा वास जरा वेगळा येतो...त्यात "सिंमेंटच्या मडक्यातनं पाणी पिल्याचा फिल येतो"... पण मला तर मातीच्याच माठातलं पानीच जास्त आवडतं, खरी तहान त्यात भागते माझी!

तस आज "वर्ड वास डे" नाही आहे की नाकाचं हाड वाढलय माझ्या पण एक वास गेला आठवडाभर येवु लागलाय तो म्हणजे नवीमुंबईतल्या राजकारणात सत्ताबदलाचा..."पुढच्या महीनाभरात शिव-वड्याचा खमंग पण खरपूस वास नवीमुंबईतल्या नाक्यानाक्यावर येतो की काय असं वाट्टय!"



तर असो आपल्याला कुठला असा वास आहे जो परत परत घ्यावासा वाटतो?.आणि आपली वासुगिरीची व्याख्या काय?...प्लीज कमेंट मधे टाका... :-)

-सुंदर य. सामंत


16.04.2015

आज भारतीय रेल्वेला 162 वर्ष पूर्ण झाली, ज्याज्या भागात रेल्वे गेली त्यात्या भागाचा विकास जलद गतीने होत गेला त्या विकासात रेल्वेच्या लाखो कामगारांचा हात आहे, देशातील सर्वात जास्त कामगार म्हणजेच 15 लाखाहून अधिक कामगार ह्या शासकीय संस्थेत सध्या आहेत... सिंधु, साहीब आणि सुलतान ह्या तीन इंजीनानी सर्वप्रथम ठाणे ते मुंबई छ.शि.ट. हा प्रवास केला... आज हीच दोन्ही स्थानकं सर्वाधिऐकतो, म्हणजे ज्यांचे ज्यांचे जन्म रेल्वेत झालेत त्यांना जन्मठिकाण "भारतीय रेल्वे" सांगायला काही हरकत नाही...रेल्वे प्रवासी टिकीटानंतर जर कुठुन महसूल कमावत असेल तर तो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतुन, दरवर्षी भारतातून 20 ते 25 लाख लोकं ह्या परीक्षा देतात वेगवेगळ्या राज्यांतुन काही हजार जागांकरता रेल्वे ही परीक्षा घेते पण त्याचा एक निश्चित कालावधी नसतो जस इतर सेवा परीक्षांचा असतो, ह्या सर्व प्रोसेस मधुन गेल्या कारणाने तसच रेल्वे हा जिव्हाळ्याच्या भाग असल्यामुळे ही माहीती मला आहे...आज हा विषय मांडण्याच कारण की कशी भ्रष्टाचाराची कीड इथेही लागलीय ते... 
बारावी झाल्यानंतर एक सामान्य तरुण रेल्वेतील तिकीट तपासणीस पदाकरता व इतर क्लास2 अशा एकुण 3 पदांकरता मध्य रेल्वेतल्या 1500 जागांकरता अर्ज करतो...आणि अभ्यासाला लागतो साधारण पाच सहा महिन्यात त्याला hallticket मिळुन 1 दिड वर्षात सर्व परीक्षा देवुन नोकरीत रुजु होऊ ही त्याची मानसिकता असते पण घडतं काहीस असं......
तो वर्षभर वाट बघतो आणि अर्ज गेला नसेल किंवा काही चुकीमुळे बाद केला असेल...आणि शासकीय यंत्राणांशी संपर्क करुनही काही उत्तर मिळत नसल्याने हा विषय तो सोडुन देतो विसरुन जातो.....
अचानक "चार" वर्षांनी जूनमधे रेल्वेच पत्र आणि hallticket येत की आँक्टोंबर मधे परीक्षा आहे, पटकन त्याला आठवतही नाही की आपण कधी अर्ज केलेला...एव्हाना तो पदवीधर होऊन एक नोकरीही करु लागलेला असतो...पण ही संधी सोडायची नाही ह्या भावनेने तो जुलै मधे नोकरी सोडुन तीन महीने रेल्वे एके रेल्वेचा सपाटुन अभ्यास करतो स्पर्धा परीक्षांची बरीचशी पुस्तक तो वाचतो..... एव्हाना ही बातमी नातेवाईक व मित्रमंडळींमधे गेलेली असते....रेल्वेत मोठ्या पदावर आफीसरची परीक्षा देतोय म्हणे...
एक दिवस कुठल्यातरी शिफारशीने "तुला पाहीजेल त्या पोस्टवर तुला नोकरी मिळेल रेल्वेत"... ह्या सुचनेचा एक फोन वडीलांच्या खास मित्राचा येतो.........एकीकडे परीक्षा होऊन हा तरुण निकालची वाट पाहू लागलेला असतो......
"सहा लाख लागतील पण हमखास नोकरी काही करायची गरच नाही डायरेक्ट लिस्ट मधे नाव येईल ट्रेनिंगला जायच 3 महीने आणि पगार चालू दोन अडीच वर्षात पैसे रिकवर"... झालं घरातुन सहमती होती पण एकदम सहा लाख आणि तेही बिनभरवशाच्या माणसाला द्यायचे....मध्य रेल्वेतला एक बडा अधिकारी आहे (इथे नाव न घेता लिहीन असं ठरवल्यामुळे नाव टाकत नाही आहे) महीना 2.5 छापतो त्याची हीच काम आहेत रे सगळे बाबू आपल्या खिशात आहेत अस म्हणत ह्या पठ्याने एक दिवस भेट घालून द्यायचा प्रस्तावच टाकला काय करावं हा मोठा प्रश्न त्या तरुणासमोर ठाकला....
आता घरचेच तयार आहेत म्हटल्यावर तरुणाकडे स्वत: हो किंवा नाही हा एकच पर्याय होता...
पण तरीही तो गेला मुंबईतल्या त्या शासकीय इमारतीत कुठल्याही सौद्याकरता नाही तर एक खात्री करण्यासाठी त्याच्या त्याच वडीलांच्या खास मित्रासोबत...
ती अख्खी इमारत ह्याच्या बापाची आहे हे एव्हाना त्या तरुणाला कळलं होतं मित्राच्या वागण्यावरुन आणि बोलण्यातून.....
पण तो सौदा झालाच नाही कधी....
आणि त्या परीक्षेचा निकाल काय लागला हे पण त्या तरुणाने कधी पाहीलं नाही...
(ही घटना सत्य असून ह्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत तरीही आपण ह्यावर विश्वास ठेवावा ही जबरदस्ती लेखक आपणास करत नाही)
-सुंदर...!

"मार"

मोठ्यांना नेहमी वाटतं आपण करु तेच योग्य...लहान आहेस तु लहान आहेस तु अस म्हणुन लहान मुलांना नेहमीच अंधारात ठेवलं जात..... नाही!!!.... कीती वाईट गोष्ठी मोठ्यांकडुनच तर होत असतात...जसे भ्रष्टाचार, बलात्कार, खुन हे सर्व माणुस मोठा झाला कीच करतो लहान पणी नाही...

भ्रष्टाचारी नेते मोठी मोठी भाषण झाडतात अगदी एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहनपर बाता मारतात पण मांडवली करायला बसले की कीती खाऊ आणि कीती नको असं होत ह्यांना...


प्रश्न मुळात हा आहे आपण मोठी मंडळी अस वागतोच का...आणि वागतोच तर लहानांकडुन चांगल्या वागण्याच्या अपेक्षांच ओझं तरी का देतो खांद्यावर???... आणि वरुन "मार" पण आहेच...म्हणजे शाळेतल्या मास्तुर्याचं बायकोशी झालेल्या भांडण्याच राग तो आमच्यावर काढणार...दुसर्यांनीच खेळताना फोडलेल्या खिडक्यांच्या काचांमुळे पण आम्हीच घरात बसायचं...आणि घरचे तर उठसुठ मालकी हक्क बजावतच असतात...आम्ही पोलीसात जाऊ शकत नाही...कारण त्यांचे डोळे बघुनच आमची फाटते...कस कसा जीव मुठीत धरुन आम्ही वरील आतंकवादाचा सामना करत असतो आम्हालाच ठाउक..

आता आम्हीपण मोठे होणारच कधीतरी पण नंतर काय बोलुन उपयोग तुमच्या सवयीही लागणारच आम्हाला...मग नक्की शहाणं कोण तुम्ही की आम्ही???
24.12.2014

"आईsss, हा सांताक्लॉज म्हणजे कोण गं?"

हा प्रश्न जसा मला माझ्या लहानपणी सारखा पडायचा तसा अगदी आताही लहान मुलांना पडत असेलच....

ख्रिसमस (नाताळ) म्हणजे 25 डिसेंबरला एक आजोबा गिफ्ट्स वाटायला येतो.... हाsss तोच तो!!!

लाल डगला... तांबडी झुबकेदार टोपी... शुभ्र दाढी-मिशा... मोठठ पोट आणि पाठीशी हेss खाउ नि गिफ्ट्स ने भरलेलं गाठोडं... तु सकाळी उठायच्या आत हळुच तो येणार आणि गिफ्ट्स देवुन जाणार... हया आईच्या कथेने माझी जेवढी उत्सुकता वाढलेली ना सांगु... तेवढी उत्सुकता कधीच सकाळी उठुन शाळेत जातांना नसायची... रात्रीच झोपताना उशाला रिकामी मोजे ठेव...सांता येईल आणि गुपचुप त्यात गिफ्ट्स ठेवुन जाईल... ख्रिसमसच्या आदल्या रात्री तो खिडकीतुन येतो आणि शहाण्या मुलांना खाऊ देवुन जातो हे जेव्हा आई बोलली तेव्हाच रात्री फुल तयारीनिशी झोपलो...आणि सकाळी पाहतो तर काय खरच दोन चॉकलेटं असायचीच... समजायला लागल्यापासुन कळालं कि तो सांता दुसरातिसरा कोणी नसुन घरचच कोणतरी ठेवायचं... आईचं असावी किंवा मग बाबा... मग परत दरवर्षी तिच सांताची गोष्ट...आणि तोच एक दिवसाचा नाताळ......

वर्षाच्या सरतेशेवटी एका दिवसासाठी येणारा सांता ख्रिस्ती बांधवांसाठी नवचैतन्य घेवुन येतो... लहानगयांपासुन मोठयांपर्यंत सगळे जिंगल बेलच्या सुरात ख्रिस्तीनववर्षाच्या आनंदात नाताळ साजरा करतात... केक, वाईन आणि भेटवस्तूंनी बाजारपेठा जशा फुलतात तशी घराघरात सजावट, रोषणाई आणि निरनिराळे फराळ केले जातात...प्रभु येशुची पुजा केली जाते... मित्र मैत्रीणी भेटतात... संध्याकाळी सांताबरोबर मिरवणुक काढली जाते... दिवाळीच असते जणु.......

"सांता येणार म्हणुन लहान मुलं रात्री उशिरा पर्यंत जाग राहणयाचा प्रयत्न करतात...पण त्यांना कधी झोप लागतेय याचीच सांता वाट बघत असतो... कारण तो घरातलाच कोणीतरी एक दिवसाचा सांता असतो..."

सांता जसा प्रेमळ, शांत आणि खेळकर अगदी तसेच ख्रिस्तीबांधव मला आज पर्यंत भासत आले आहेत... जात धर्म याव-ताव यामध्ये भांडणं नेहमीची पण शांतता अंगी कशी बाणावी याचा उत्तम परिचय जेव्हा मी एखाद्या ख्रिस्ती मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा होतो...अतिशय स्मितभाषी, मायाळु आणि शांत असणारे ख्रिश्चन कधी आपलसं करतात कळतही नाही...कुठल्याही तुकार मुद्द्यावरुन वाद आणि दंगली घडवणे हे त्यांचा गावीही नाही... हयाला अपवाद असतीलही पण तेही दुर्मिळच...........

किती शांततेने सगळं सुरु असतं church मध्ये...प्रत्येक विधी अगदी संयमाने पध्दतशीर होत असतो...कसलीही घाई नाही की जबरदस्ती... नाहीतर आपलं...मंदीरात घंटानाद तर असा सुरु असतो जस देव नाही कुंभकरणच झोपलाय गाभारयात...खुप काही शिकण्यासारखं असतं वेगवेगळया धर्मांचया चालीरीतींतुन...... शेवटी कुठलाच देव सांगत नाही माझी पुजा करा... मला धुप अगरबत्ती दाखवा... घंटानाद करा... जोरजोरात आरत्या म्हणा.......देवळात, मशिदीत आणि इतर कुठल्याही धर्म मंडपात जर शांत मनाने आणि एकाग्रतेने जाल तर त्याचं दर्शन कुठल्या ना कुठल्या रुपात होईलच........ असो!!!

उदया घरी कोणीतरी केक आणि नारळातल्या तेलात भाजलेला आंबोळया (घावणे) आणून देईल...त्याचीच वाट बघतोय... म्हटलं तो पर्यंत लिहु काहितरी नाताळ special... मग दुपारी कुठल्यातरी मित्राकडे लंच आणि परत संध्याकाळी सांताक्लॉज बरोबर मिरवणुक आणि शेवटी रात्री वाईन, शेकोटी आणि मित्रांसोबत धमाल...हा दरवर्षीचा कार्यक्रम ठरलेला...काही सण जात धर्म विसरायला लावतात... त्यातल्याच हा एक 25 डिसेंबरचा नाताळ... किती नव निर्मितीचा सुगंध घेवुन येतो हया गुलाबी थंडीत... आणि घेवुन जातो कुठल्यातरी परग्रहावरच्या सांता आजोबांच्या दुनियेत रेनडियरच्या बग्गीत बसुन नविन वर्षांकडे........

सगळयांना नाताळ व नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा....

Merry Christmas... & Happy NewYear...


- सुंदर यशवंत सामंत

(अभिप्राय क्रमांक व मेल : +917666784696 / sundar000049@gmail.com)
21.2.2015


दिनांक 21.02.2015, शनिवार.
काल दि. 20.02.15 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मंत्रालय दालन क्रमांक 601 मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मंत्र्यांचे 2 सहायक, ऐरोली संघर्ष समितीतील 11 मुख्य सदस्य, MSRDCचे सहसंचालक श्री एस.एम.रामचंदानी, Executive Engineer श्रीमती परदेशी (व त्यांचे अन्य 2 सहकारी) , IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर (व त्यांचे 5 अन्य सहकारी) अधिकारी असे 22 जण यांचेसोबत टोल संबंधित चर्चा करण्यासाठी एक एकत्रित मिटिंग आयोजित होती ह्या सभेस मंत्रीमहोदय घरघुति अडचणीमुळे दुपारी 3 वाजता  हजर नव्हते तरीही अर्धा ते पाउण तास वाट पाहुन सर्वानुमते सभा सुरु करण्यात आली सदर सभेदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुद्यांना विचारात घेऊन लवकर निर्णय घेवू , असा पवित्रा घेतला होता. परंतु आपल्या सदस्यांनी खारघर प्रमाणे आम्हाला देखील सूट/सवलत मिळाली पाहिजे ही मागणी लावून धरली. अनेक गोष्टी कागद पत्रांसोबत दाखविल्या असता, त्यांनी GR सम्बंधित व एकूणच टोल धोरणाविषयी अनेक विसंगति असल्याचे कबुल केले. परंतु  मंत्रीमहोदय नसल्याणे काहीच निर्णय त्यावेळेस शक्य नाही असे सांगितले व सभा 4:30 वाजता आटपण्यात आली.
परंतु आम्ही (ऐ.सं.स.)सर्वांनी मंत्रीमहोदय येइपर्यंत आम्ही थांबणार आहोत असे 4:40 वाजताच सांगितले. मंत्री शिंदे हे आर.आर. पाटील ह्यांच्या शोकसभेला जाउन मंत्रालयात येतील अशी माहीती देण्यात आली तरीही आम्ही मंत्र्याना भेटुन सभा पुर्ण करुनच जाणार ह्यावर ठाम होतो त्या दरम्यान IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर व अन्य 4 सहकारी त्यांचा एक प्रतिनिधी मंत्रालयात बसवुन मंत्रालयातुन निघुन गेले मंत्रीमहोदय संध्याकाळी मंत्रालयात 6:20 वाजता आल्यावर ते इतर काम आटपुन सभेला 7:30 वाजता पुन्हा एकदा सुरुवात  झाली ह्या सभेत मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे, ऐरोली संघर्ष समितीतील 11 मुख्य सदस्य व MSRDCचे सहसंचालक श्री एस.एम.रामचंदानी, Executive  Engineer श्रीमती परदेशी , IRB/MEP चे एकच प्रतिनिधि असे 18 जण उपस्थित होते आपली मागणी व त्यांचे आधी दिलेले उत्तर यावर मंत्रीमहोदयांसमोर पुनश्च चर्चा झाली. परंतु ह्या संध्याकाळच्या सभेकरिता IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर व त्यांचे अन्य 4 ते 5 सहकारी उपस्थित नव्हते. मंत्रीमहोदयांनी आपली मागणी हे त्यांची मागणी देखील असल्याचे सांगितले. यावेळी अनेक कागदपत्रे व सरकारी अनास्थेचे आम्ही ऐरोलिकर कसे बळी ठरत आहोत , याचे आम्ही पुरेपूर पुरावे उदहरणासाहित तेथे सादर केलेले आहे. अनेक मुद्दे पुढे ठेवून अथकपणे आम्ही सर्वांशि चर्चा केलेली आहे. परंतु कंत्राटदार ह्यावेळी नथांबल्याने ह्या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्याकरिता पुन्हा दोन-चार दिवसांनी मंत्रीमहोदयांनी भेटायला बोलविले आहे व ठीक 8:25 ला सभेची सांगता झाली.
सद्यस्थितीत आता पुढची भेट झाल्यावर आपल्या सर्वांना त्याची माहिती दिली जाईल, असे आम्ही आपणा सर्वांना सांगू इच्छितो.
-"ऐरोली संघर्ष समिती"
airolisangharshsamiti@gmail.com
धन्यवाद!


17.2.2015


माणसाने चांगल्या गोष्टींचे तेवढे "डेज" बनवलेत.. स्वताःच्या भौतिक सुखासाठी..कधी ऐकलय का "रेप डे", "मर्डर डे", "robbery डे"...नाय ना... ह्या असल्या गोष्टीही होत असतात की समाजात... राजरोसपणे......आणि ह्यासारख्या कितीतरी तेही रोज....त्याचही सेलिब्रेशन का करु नये.......!!!....


सुन्न पडलेल्या डोक्यात खोलवर चांगल्या आणि वाईट गोष्ठींसाठी खरच जागा असते...? की फक्त copy आणि pest एवढच करत आयुष्यातले डेज साजरे करतो आपण...???
19.1.2015


काल सेक्टर 14 इथे झालेली मिटिंग अतिशय चांगल्या पध्दतिने पार पडली पहील्याच मिटिंगला ऐरोलीकरांचा मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता... सुरवात सर्वांचा परिचय करुन झाली...कोणी डॉक्टर कोणी इंजीनियर कोणी रिटायर्ड परसन तर काहींकडे कुठलच वाहन नसतानाही ते हया मुद्द्यावर एकञ येवुन काही तरी समाजउपयोगी करण्यासाठी व पुढेही समाजावर होणारया अन्यायावर लढण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी सहभागी झाले...व त्यातुन एका समितीची स्थापना झाली "ऐरोली संघर्ष समिति"...मग RTI कार्यकर्ता उमेश थोरात यांनी गेल्या वर्षभरात सरकार दरबारी खेटया घालून जमा केलेल्या अधिकृत माहीतीचे विश्लेषण केले... मग त्यावर सगळयांच मत जाणुन घेण्यात आलं... पहली प्राथमिकता प्रचार व कार्याचा प्रसार हा झाला पाहीजे त्यामूळे ती सुरवात करण्यासाठी मग पञकं छापणे, सहयांची मोहीम राबवणे, फलक लावणे त्यासाठी अधिकृत परवानगया घेणे...ही सगळी कामे वाटुन घेण्यात आली... यासाठी काहींनी पुढाकाराने वर्गनीही दिली तर काहींनी अमुक एक पञकांचे खर्च उचलणयाची तयारी केली... 4101 रुपये जमलेली रक्कम 5 जणांच जाँईट अकाउंट उघडुन त्यात जमा करावी असे एकमताने निर्णय घेण्यात आला... उपस्थित सर्वांचा माहीतीचे संगणकीय डाक्युमेंटेशन करण्यात आलं...व सरतेशेवटी सर्वांनी जास्तीत जास्त सामान्य ऐरेलीकर जोडले जावेत हया चळवळीशी अशी आशा व्यक्त केली...


इथे बाबासाहेबांच एक वाक्य आठवत...
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात,तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात..."
1.1.2015

कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
भिंतीवरच्या कैलेंडर च रद्दीत जाणं असतं हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
येणारया नविन वर्षाचं बारसं असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
फक्त पार्टीला एक कारण असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
26/11 ला असुनही नसतं, तेच असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
दारुचे ग्लास आणि नाचगाण रास इथेच असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
नविन संकल्पांच रान असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
कुणाची दिवाळी तर कुणाच्या गावीही नसत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
कुणासाठी पहीलं तर कुणासाठी शेवटचचं असत हे।


कसलं थर्टी फर्स्ट असत हे।।
हाss ते वाजतय ना तिकडे डिजे तिथे सापडेल...!!!


-सामंतांचा सुंदरया......


22.12.2014

ऐरवी तशी लवकर जाग येत नाही सकाळी पण आज एक वेगळीच उत्सुकता मनात होती, ती म्हणजे पहील्यांदाच मतदान करण्याची, गजर नलावताच पहाटे चार वाजता जाग आली म्हणावी तशी झोपही लागली नाही कारण उत्सुकता होती पहील्यांदाच मतदान करण्याची... बरेचदा अर्ज भरुनही नाव काही येत नव्हत मतदार यादित... पण मतदाराची पात्रता पूर्ण केल्यानंतर पाच वर्षांनी नाव आल हया विधानसभेला...



घरातले सगळे गाढ झोपेत आणि मी इकडे अंघोळ वैगरे होऊन कधी एकदा सहा वाजतायत आणि मी निघतोय याचीच वाट बघत होतो...आणि बरोबर सहा वाजता म्हणजे एक तास लवकर मी निघालो... कारण पहीलच मतदान मग सगळयात पहील जाऊन कराव ऐवढीच काय ती उत्सुकता...थोड दिसु लागलं होतं... पाच मिनिटात बुथवर हजर... सगळीकडे शुकशुकाट होता...कुतरही नव्हतं एव्हाना आलं... हळु हळु पोलिस आणि इतर निवडणुक कर्मचारी येवु लागले...



साडे सहा वाजले आणि मी शाळेचा गेटला खेटुनच उभा राहीलो... हळु हळु माझ्या मागे लोक येवुन उभी राहु लागली... कालर लगेचच टाईट ना मंग... आज पहिलांदाच कुठेतरी पहिला नंबर लागला होता ना आपला... पाचच मिनिटं बाकी होती सात वाजायला... आणि तो क्षण आला ज्याची वाट मी पाच वर्ष बघीतली... झालं एकदाच "मतदान"...दोन मिनटं ही लागली नव्हती पण आपली सरकारं...काय म्हणावं...