आमच्या घरासमोरच मंदीर आहे ज्यात... गणपती, दत्त, एकविरा आई, आणि शंकराची पिंड आहे,
म्हणजे मी खिडकीत उभा राहीलो की तिकडे दर्शनासाठी येणार्या बायका पूजा करताना दिसतायेत मला, मी आत्ताही खिडकीत राहुन तुलाच इमैजिन करतोय तु खाली आहेस मी वरुन तुला पाहतोय, तु मस्तपैकी पूजा करतेय, मधेच तु एक कटाक्ष टाकलाय मी तुला वरुनच फ्लाईंग किस सेंडलाय त्याला तु गालात लाजुन रिस्पांस दिलाय आणि तु आता त्या पिंडीवर दूध घालतेय तुझं लक्ष्य माझ्याकडेचय, तुझी पूजा झालीय, मी खिडकीतूनच पाहतोय तु बाकीजणींशी काहीतरी बोलतेय, पण नजर फिरून फिरून वरच येतेय, मी कंटीन्यु तुला पाहतोय, मी धावत खाली आलोय, आता तु निघालीय, बाहेर आलीयेस मंदीराच्या... चप्पल शोधतेयेस, चप्पल शोधताना दोनदा वर पाहीलस पण आता मी खिडकीत नाहीच दिसतय तुला....तुला चप्पलही गावेना झालय, तुझा जीव घाबराघुबरा झालाय, मी वर आलोय आता, परत खिडकीतूनच तुला पाहतोय, तु कोणालातरी फोन लावलायेस, माहीत नाही कोणाला, आता तु अजीबातच वर बघत नाहीएस, इकडे माझापण फोन वाजतोय मी फोन उचलुन कानाला लावलाय पण लक्ष्य तुझ्यावरच खाली आहे...आणि फोनवर समोरून एका मुलीचा आवाज आला "चप्पल खाली आणताय का???"
-प्रेयसी आता बायको झालीय हे विसरणारा नवरा.
No comments:
Post a Comment