Thursday, June 11, 2015

24.12.2014

"आईsss, हा सांताक्लॉज म्हणजे कोण गं?"

हा प्रश्न जसा मला माझ्या लहानपणी सारखा पडायचा तसा अगदी आताही लहान मुलांना पडत असेलच....

ख्रिसमस (नाताळ) म्हणजे 25 डिसेंबरला एक आजोबा गिफ्ट्स वाटायला येतो.... हाsss तोच तो!!!

लाल डगला... तांबडी झुबकेदार टोपी... शुभ्र दाढी-मिशा... मोठठ पोट आणि पाठीशी हेss खाउ नि गिफ्ट्स ने भरलेलं गाठोडं... तु सकाळी उठायच्या आत हळुच तो येणार आणि गिफ्ट्स देवुन जाणार... हया आईच्या कथेने माझी जेवढी उत्सुकता वाढलेली ना सांगु... तेवढी उत्सुकता कधीच सकाळी उठुन शाळेत जातांना नसायची... रात्रीच झोपताना उशाला रिकामी मोजे ठेव...सांता येईल आणि गुपचुप त्यात गिफ्ट्स ठेवुन जाईल... ख्रिसमसच्या आदल्या रात्री तो खिडकीतुन येतो आणि शहाण्या मुलांना खाऊ देवुन जातो हे जेव्हा आई बोलली तेव्हाच रात्री फुल तयारीनिशी झोपलो...आणि सकाळी पाहतो तर काय खरच दोन चॉकलेटं असायचीच... समजायला लागल्यापासुन कळालं कि तो सांता दुसरातिसरा कोणी नसुन घरचच कोणतरी ठेवायचं... आईचं असावी किंवा मग बाबा... मग परत दरवर्षी तिच सांताची गोष्ट...आणि तोच एक दिवसाचा नाताळ......

वर्षाच्या सरतेशेवटी एका दिवसासाठी येणारा सांता ख्रिस्ती बांधवांसाठी नवचैतन्य घेवुन येतो... लहानगयांपासुन मोठयांपर्यंत सगळे जिंगल बेलच्या सुरात ख्रिस्तीनववर्षाच्या आनंदात नाताळ साजरा करतात... केक, वाईन आणि भेटवस्तूंनी बाजारपेठा जशा फुलतात तशी घराघरात सजावट, रोषणाई आणि निरनिराळे फराळ केले जातात...प्रभु येशुची पुजा केली जाते... मित्र मैत्रीणी भेटतात... संध्याकाळी सांताबरोबर मिरवणुक काढली जाते... दिवाळीच असते जणु.......

"सांता येणार म्हणुन लहान मुलं रात्री उशिरा पर्यंत जाग राहणयाचा प्रयत्न करतात...पण त्यांना कधी झोप लागतेय याचीच सांता वाट बघत असतो... कारण तो घरातलाच कोणीतरी एक दिवसाचा सांता असतो..."

सांता जसा प्रेमळ, शांत आणि खेळकर अगदी तसेच ख्रिस्तीबांधव मला आज पर्यंत भासत आले आहेत... जात धर्म याव-ताव यामध्ये भांडणं नेहमीची पण शांतता अंगी कशी बाणावी याचा उत्तम परिचय जेव्हा मी एखाद्या ख्रिस्ती मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा होतो...अतिशय स्मितभाषी, मायाळु आणि शांत असणारे ख्रिश्चन कधी आपलसं करतात कळतही नाही...कुठल्याही तुकार मुद्द्यावरुन वाद आणि दंगली घडवणे हे त्यांचा गावीही नाही... हयाला अपवाद असतीलही पण तेही दुर्मिळच...........

किती शांततेने सगळं सुरु असतं church मध्ये...प्रत्येक विधी अगदी संयमाने पध्दतशीर होत असतो...कसलीही घाई नाही की जबरदस्ती... नाहीतर आपलं...मंदीरात घंटानाद तर असा सुरु असतो जस देव नाही कुंभकरणच झोपलाय गाभारयात...खुप काही शिकण्यासारखं असतं वेगवेगळया धर्मांचया चालीरीतींतुन...... शेवटी कुठलाच देव सांगत नाही माझी पुजा करा... मला धुप अगरबत्ती दाखवा... घंटानाद करा... जोरजोरात आरत्या म्हणा.......देवळात, मशिदीत आणि इतर कुठल्याही धर्म मंडपात जर शांत मनाने आणि एकाग्रतेने जाल तर त्याचं दर्शन कुठल्या ना कुठल्या रुपात होईलच........ असो!!!

उदया घरी कोणीतरी केक आणि नारळातल्या तेलात भाजलेला आंबोळया (घावणे) आणून देईल...त्याचीच वाट बघतोय... म्हटलं तो पर्यंत लिहु काहितरी नाताळ special... मग दुपारी कुठल्यातरी मित्राकडे लंच आणि परत संध्याकाळी सांताक्लॉज बरोबर मिरवणुक आणि शेवटी रात्री वाईन, शेकोटी आणि मित्रांसोबत धमाल...हा दरवर्षीचा कार्यक्रम ठरलेला...काही सण जात धर्म विसरायला लावतात... त्यातल्याच हा एक 25 डिसेंबरचा नाताळ... किती नव निर्मितीचा सुगंध घेवुन येतो हया गुलाबी थंडीत... आणि घेवुन जातो कुठल्यातरी परग्रहावरच्या सांता आजोबांच्या दुनियेत रेनडियरच्या बग्गीत बसुन नविन वर्षांकडे........

सगळयांना नाताळ व नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा....

Merry Christmas... & Happy NewYear...


- सुंदर यशवंत सामंत

(अभिप्राय क्रमांक व मेल : +917666784696 / sundar000049@gmail.com)

No comments:

Post a Comment