Thursday, June 11, 2015

2.6.2015

नवीमुंबई महानगरपालिकेचा वैद्यकीय कर्मदळिद्रिपणा!

नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुका आणि मतांच्या भिकेसाठी लोकांच्या घरी जाऊन चपला झिजवणारे लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेला खरी गरज असते तेव्हा कुठे गायब असतात हा प्रश्न आज प्रकर्षाने जाणवत होता जेव्हा एका गरजु गरोदर स्त्रीला शासनाच्या भोंगळ कारभाराचा सामना करावा लागला....
सोनोग्राफी करण्यासाठी म्हणून दिघ्यातील पालिकेच्या रुग्णालयात गेलेल्या चार महीन्याच्या गरोदर महीलेला कारण नसताना न.मुं.म.पालिकेच्या वैद्यकीय अनास्थेला बळी पडावे लागले, सोनोग्राफीसाठी एकट्याच गेलेल्या गरीब महीलेला सर्वप्रथम तिथूनच जवळ 20 मिनिटावर असलेल्या खाजगी दवाखान्यात पाठवण्यात आले कशीबशी उन्हातान्हात ती गेलीही तिकडे पोचल्यावर पहीला बराच वेळ कोणी दादच देईना मग तिथुन काहीही कारण न देता तिला रबाळेतील पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले तिकडेही ती पोहचली तर तेथील कर्मचार्यांनी मशीनरी उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला वाशीला जायला सांगीतले, शुक्रवारी वाशीत सोनोग्राफी होत नाही हे रबाळ्यातील कर्मचार्यांना माहीत असुनही त्यांनी तीला तिकडे जाण्यासाठी सांगितले, रणरणत्या उन्हात ती तशीच बसने वाशीत पोहचली तिकडे गेल्यावर तीला डॉक्टरच उपलब्ध नाहीत, आज सोनोग्राफी होणार नाही, तुम्हाला पाठवलच कसं हे प्रश्न करुन तीला घरी जाण्यास सांगण्यात आले एव्हाना दुपारचे दोन वाजुन गेले होते, एक एकटी गरीब गरोदर महिला 4 ते 5 तास कडक उन्हात कारण नसताना हा त्रास सहन करते आज जर ती कुठे चक्कर येऊन पडली असती काही अपघात झाला असता तर ह्याला जबाबदार कोण???...नव्या करकरीत इमारतेतील वातानुकुलित कक्षात बसून पालिकेचा कारभार सांभाळणार्यांना कधी कळणार जनतेचा त्रास???...पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ह्यांना जबाबदारीची जाणीव कधी होणार???... ही काय पहील्यांदा घडलेली घटना नाही ह्या आधीही आणि उद्याही ह्या अशा त्रासाला लोकं बळी पडतील, नुसतं सायबर सिटी म्हणून मिरवणार्या आणि महागड्या गाड्यातुन फिरणार्या लोकप्रतिनीधिंनी एक गोष्ट लक्षात असुद्या की तुम्ही जनतेचे नोकर आहात काहीच हक्क नाही तुम्हाला आमच्या कररुपी मिळणार्या पैशातुन चैन करण्याचा!!!

No comments:

Post a Comment